नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या राजधानीत आज सकाळी सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तसंच आज कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

तापमानात होणारी घट, वाढती आर्द्रता आणि थंड वा-यामुळे दिल्ली आणि उपनगरात प्रदूषणाचा स्तर वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या अकरा दिवसात वायू गुणवत्ता निर्देशांकानं तीनशे अंकांचा टप्पा ओलांडला असून काही  ठिकाणी प्रदूषणानं गंभीर पातळी गाठ्ली आहे.