पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुण्यात पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांच्या परिषदेत मार्गदर्शन करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं असून परिषदेला राज्यपोलिस दल, विविध चौकशी यंत्रणा तसंच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे अधिकारी उपस्थित आहेत.

भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्थेत होत असलेल्या या परिषदेत केंद्रिय गृहमंत्री अमित शाहही उपस्थित आहेत. तंत्रज्ञान स्नेही तपास यंत्रणा आणि पोलिसिंग तसंच विज्ञानाधरित, न्यायवैदयकावर आधारित तपास हा या परिषदेचा विषय आहे.

दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संस्थेच्या आवारात पोलिस महासंचालकांबरोबर मार्निंगवॉक केला तसंच योगासनंही केली. या परिषदेत एक ब्रृहत अंतर्गत सुरक्षा आराखड्याचा मसुदा तयार केला जाण्याची शक्यता आहे.