नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना केलं आहे. पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत काल ते वैज्ञानिकांशी बोलत हाेते.

वैज्ञानिकांनी यावेळी विविध विषयांवर सादरीकरण केलं. यात कृषी जैव- तंत्रज्ञान, तसंच नैसर्गिक स्त्रोतांचा शोध घेण्यासाठी स्वच्छ उर्जा सामुग्री आणि उपकरणं अशा विविध विषयांचा समावेश होता.

हवामानबदल, गणिती वित्तीय संशोधन यांसारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर वैज्ञानिकांनी सादरीकरण केलं. प्रधानमंत्र्यांनी वैज्ञानिकांच्या सादरीकरणाबद्दल त्यांची प्रशंसा केली. त्यापुर्वी मोदी यांनी संस्थेच्या परिसरात विद्यार्थ्यांशी आणि संशोधकांशी संवाद साधला.