मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनच्या तपासणी करून, स्कूल बस नियमावलीतल्या तरतुदींचं पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना अप्पर परिवहन आयुक्त स. बा. सहस्त्रबुद्धे यांनी दिल्या आहेत.
ऑटोरिक्शातून विद्यार्थ्यांची वाहतूक करायला कोणतीही परवानगी दिलेली नाही, त्यामुळे अशा रिक्शाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असंही, सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केलं आहे.