मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प झाली आहेत असा आरोप, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
ते सिंधुदुर्गातल्या कणकवली इथं वार्ताहरांशी बोलत होते. हे स्थगिती सरकार आहे अशी टीकाही राणे यांनी केली. केवळ कंत्राटदारांकडून पैसे उकळणं हा यामागचा उद्देश आहे असा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या सरकारनं ‘क’ वर्गाअंतर्गतच्या कोकणातल्या पर्यटन योजनांना दिलेल्या स्थगितीविरोधात, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हात आंदोलन करणार आहे.
त्यासाठी १५ ते १८ डिसेंबर मध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव बैठका घेऊन, ठप्प झालेल्या विकासकामांना महाविकास आघाडीचं सरकार कसं जबाबदार आहे या विषयीची माहिती नागरिकांना दिली जाईल असं राणे यांनी सांगितलं.