नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या साठवणुकीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीची मर्यादा ५ टन वरून दोन टन केली आहे. खुल्या बाजारात जास्त प्रमाणात कांदा यावा म्हणून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

सर्व राज्य  सरकारांनी कांद्याच्या अवैध साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं केली आहे. घाऊक व्यापाऱ्यांसाठी देखील २ टनांची मर्यादा कायम ठेवण्यात आल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिली. कांद्याची आयात करणाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे.