नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली मुंबई नियोजित महामार्गाच्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी ११ हजार सहाशे चोवीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, यापैकी पाच हजार तीनशे अट्ट्याहत्तर कोटी रुपये मोबदला संबंधित जमीन मालकांना अदा करण्यात आला असल्याचं, रस्ते आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी सांगितलं, लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही माहिती दिली.

भूसंपादन मोबदल्यासंदर्भात सरकार वेळोवेळी आढावा घेत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. यावेळी जलदगती महामार्गाच्या बत्तीस प्रकल्पांवर लोकसभेत चर्चा करण्यात आली. महामार्गासाठी भू संपादन करताना, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, वृक्षतोड झाल्यावर वृक्षपुर्नलागवड केली जाईल अशी माहिती गडकरी यांनी दिली.