नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या लाहोर इथल्या दहशतवादविरोधी न्यायालयानं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या तीन साथीदारांना, दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक सहकार्य केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या घटनेचं अमेरिकेनं स्वागत केलं आहे. पाकिस्ताननं आपलं आंतरराष्ट्रीय दायित्व लक्षात घेऊन, या आरोपींवर, २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातला खटला, न्यायिक तत्वानं चालवावा, असं आवाहन, अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री जी. वेल्स यांनी ट्विटर संदेशाच्या माध्यमातून केलं आहे.