नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत २०२० मध्ये होणार्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करायचा कोणताही प्रयत्न करु नये, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरीव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा इशारा दिला. ट्रम्प यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतला प्रचार आणि रशियाचा संबंध असल्याच्या आरोपांचा तपास करण्याची FBI नं तयारी दर्शवली असल्याचं अमेरिकेच्या विधिविभागानं सांगितल्यानंतर ट्रम्प यांनी रशियाला हा इशारा दिला आहे.
मात्र ट्रम्प यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली नसल्याचं लॅवरोव यांनी सांगितलं.