नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियावरचं स्वस्त औषध गंभीर आजारी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखू शकत नाही हे आता सिद्ध झालं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये यासाठी काही प्रमाणात उपयुक्त असलं तरी ते आजाराचा प्रतिबंध करतं, कि आजाराची तीव्रता कमी करतं याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं त्यांनी सांगितलं.
कोरोनाच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या चाचण्या घेणं बंद करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच घेतला. या पार्श्वभूमीवर त्या आज लंडन इथं बोलत होत्या.