नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमध्ये भारतीय सैनिकांना शहीद होण्यासाठी निःशस्त्र पाठवलं होतं, हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. सीमेचं रक्षण करणाऱ्या सर्व भारतीय सैनिकांकडे नेहमी शस्त्रं असतात, त्यानुसार १५ जूनला गलवानमधे असलेल्या सैनिकांकडेही शस्त्रं होती, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं.

१९९६ आणि २००५ च्या करारांनुसार समोरासमोर असताना बंदुकीसारखी शस्त्रं वापरायची नाहीत, ही रीत खूप काळ चालू आहे, असं त्यांनी सागितलं.