नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे मंत्रालयाशी संबंधित डेडिकेटेड फ्रेट कोर्पोरेशननं चीनच्या कंपनीशी केलेला करार रद्द केला आहे. २०१६ मध्ये, डेडिकेटेड फ्रेट कोर्पोरेशननं ४०० किलोमीटर लांबीच्या कानपुर ते दीन दयाळ उपाध्याय दरम्यानच्या रेल्वे मार्गावरच्या सिग्नल व्यवस्थेचं काम चीनच्या बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाइन इन्स्टिट्यूटला दिलं होतं.
मात्र चार वर्षात केवळ २० टक्केच काम झालं. कंपनीचे अभियंते कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतात, अशी कारणं देऊन हा करार रद्द करण्यात आला आहे.