नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हंगेरीत बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात भारताच्या रविंदरनं रौप्य पदक पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात किर्गिस्तानचा कुस्तीपटू उलूकबेकनं रविंदरचा ५-३ असा पराभव केला.

यापूर्वी उलूकबेकनं २३ वर्षांखालील आशियायी कुस्ती अजिंक्यपद मिळवलं आहे. या सामन्यात पहिल्या फेरीच्या अखेरपर्यंत रविंदर पुढे होता मात्र उलूकबेकनं शानदार पुनरागमन करत हा सामना जिंकला. यावर्षी आयोजित कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचं हे पहिलंच पदक आहे.

आतापर्यंत झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारतानं ५ रौप्य  पदकं जिंकली आहेत.