नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत हवेतील धूलिकणांचं प्रमाण आजही वाढलेलच होतं. आज सकाळी हवेतील धुळीकणाचा निर्देशांक 410 पर्यंत खाली आला होता. एवढा कमी निर्देशांक प्रदूषण वाढल्याचं दर्शवतो.
दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांमुळे, रोपांची खुंट जाळल्यामुळे, वाहनांच्या उत्सर्जनामुळे आणि पर्यावरणाच्या प्रतिकुल स्थितीमुळे हे प्रदूषण वाढल्याचं बोललं जात आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयानुसार रोपांची खुंट जाळ्ल्यामुळे दिल्लीचं प्रदूषण काल 35 टक्क्यांनी वाढलं आहे.
वाढत्या प्रदुषणामुळे लोकांनी आवश्यकता नसेलतर बाहेर जाणं टाळावं तसंच सूर्योदया आधी आणि सूर्योदया नंतर विशेष काळजी घेण्याचं आवाहन सफर या सरकारी संस्थेनं केलं आहे.