नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रातले उद्योजक मोठया प्रमाणावर पुढे येत आहेत, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणून नव्यानं अस्तित्वात आलेल्या जम्मू काश्मीरमधल्या प्रशासकीय स्थितीत केवळ दोन महिन्यात मोठे बदल घडून आले आहेत. परिणामी युवावर्ग आणि अर्थव्यवस्थेच्या क्षमतेचा लाभ घेण्यासाठी खासगी क्षेत्र सरसावलं आहे, अंस सिंह यांनी सांगितलं.

ते नवी दिल्लीत बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी प्राईस वॉटरहाऊस कूपर्सनं केलेल्या जम्मू-काश्मीरमधे सादरीकरणादरम्यान बोलत होते. कलम-370 मुळे एक प्रकारचा मानसिक दबाव असल्यानं याआधी इथे गुंतवणूक करायला कोणीही राजी नव्हते, असं ते म्हणाले. ही कंपनी भर्ती प्रक्रिया सुरु करणार आहे. याशिवाय काश्मीर विद्यापीठ, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय व्यवस्थापन संस्था आणि इतर शैक्षणिक संस्थाही लवकरच कॅम्पस भर्ती करणार आहेत.