मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. ही योजना एक मार्चपासून लागू होईल. १ जूनपासून कर्जाचं पुनर्गठन केलं जाईल. हे पैसे शेतक-यांच्या खात्यात थेट जमा होतील, असा खुलासा अर्थमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केला.

राज्यसरकारनं सातबारा कोरा करण्याचं दिलेलं वचन पाळलं नाही, म्हणून निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला. दहा रुपयात शिवभोजन योजना लवकरच सुरु केली जाणार आहे. सुरुवातीला ५० केंद्र सुरु करु, असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. अंगणवाडी कर्मचा-यांना द्यायच्या वाढीव मानधानाचा आदेश निर्गमित करुन त्याची अंमलबजावणीपासून केली जाणार आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत साडेसहा हजार कोटींपेक्षा जास्त निधी वितरित केला आहे. केंद्राकडून मदत आल्यानंतर आणखी निधी वितरित केला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. पुढलं अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारी २०२० पासून मुंबईत सुरु होणार आहे.