नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (एनआयपी)साठीच्या ऑनलाईन डॅशबोर्डचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केले.
भारतीय पायाभूत प्रकल्पासंबंधीची माहिती सर्व भागधारकांना एकाच ठिकाणी मिळावी यादृष्टीने ऑनलाईन डॅशबोर्डची सुरुवात करण्यात आली आहे. इंडिया इन्वेस्टमेंट ग्रीडच्या (IIG) (www.indiainvestmentgrid.gov.in).संकेतस्थळावर डॅशबोर्ड उपलब्ध आहे. आयआयजी एक संवादात्मक आणि डायनॅमिक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जो देशातील अद्ययावत आणि रिअल-टाइम गुंतवणूक संधींची माहिती पुरवतो.
याप्रसंगी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, “एनआयपीमुळे आत्मनिर्भर भारत व्हिजनला चालना मिळणार आहे. आयआयजीवर एनआयपी प्रकल्पांच्या उपलब्धतेमुळे गुंतवणूकदारांना अद्ययावत प्रकल्प माहिती मिळेल आणि पीपीपी प्रकल्पांसाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करेल. एनआयपी कार्यान्वयन करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे – यामुळे देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळेल”.
इंडिया इन्वेस्टमेंट ग्रीड (आयआयजी) (www.indiainvestmentgrid.gov.in),हा संवादात्मक आणि गतीशील ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, ज्या माध्यमातून जागतिक गुंतवणूकदार समुदायाला भारतातील गुंतवणुकीच्या संधींविषयी माहिती पुरवली जाते. नॅशनल इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अँड फॅसिलिटेशन एजन्सी, इन्व्हेस्ट इंडियाद्वारे विकसित आणि व्यवस्थापित केलेले आयआयजी भारतातील गुंतवणूकीचे प्रवेशद्वार म्हणून काम करते आणि जगभरातील भारतीय उच्चायुक्तालये आणि दूतावासांद्वारे याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.आयआयजी द्वारे गुंतवणूकदारांना पुढील गोष्टी शक्य होतात :
विविध क्षेत्रांतील गुंतवणूक संधींबद्दल देशभरातील माहिती शोधन
प्राधान्य प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा आणि प्रकल्पात रस दाखवणे
प्रकल्प प्रवर्तकांशी थेट संवाद