नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षानं निर्विवादपणे सत्ता मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे.

भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याची अपेक्षा मोदी यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केली. हुजूर पक्षानं या निवडणुकीत प्रचंड बहुमतानं विजय  मिळवला.