नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची भरपाई देताना केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय केला जात नाही असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचे सर्व आरोप आज फेटाळून लावले.
केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याला ऑगस्ट पासून भरपाई दिलेली नाही असं त्यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा कराची भरपाई सर्व राज्यांना देण्यासाठी केंद्र सरकार प्रतिबद्ध आहे, अशी ग्वाही सीतारामन यांनी दिली. राज्यसभेत तिसऱ्या विनियोजन विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.