नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्ष पूर्ण झाली. या हल्यात शहीद झालेल्या जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. २००१ ला आजच्याच दिवशी संसद भवनावर हल्ला झाला होता.

कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत कटीबद्ध आहे, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.  त्याचबरोबर उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते गुलाबनबी आझाद यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

या प्रसंगी संसद भवनात  रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं. आजच्याच दिवशी लष्कर-ए-तय्यबा,आणि जैश-ए-मोहम्मद च्या दहशतवाद्यांनी संसद भवनावर हल्ला केला होता.