मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम होणार आहे, तर विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या अधिवेशनात अवकाळी ग्रस्त शेतक-यांची कर्जमाफी, प्रकल्प स्थगिती असे मुद्दे मांडले जाणार आहेत. अधिवेशानात तारांकित प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. अशा प्रकारचं हे पहिलेच अधिवेशन असणार आहे.

पुरवणी मागण्या लक्षवेधीसूचनासह शासकीय विधेयके तसंच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव चर्चीला जाणार आहे.