नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमध्ये काल झालेल्या हिंसक निर्दशानांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध केला आहे. हिंसाचारात सहभागी होणा-यांवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, तसंच रस्त्यावर किंवा रेल्वेमार्गांवर अडथळे आणू नयेत, असं त्या म्हणाल्या.

नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि प्रस्तावित देशव्यापी नागरिक नोंदणी आपल्या राज्यात लागू होणार नाही याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला. सरकारी मालमत्तेला नुकसान पोचवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असं बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं.