नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना हिंसा सोडून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. काल कोलकाता इथं राजभवनात बातमीदारांशी बोलताना धनखर यांनी राजकीय पक्षांना संयम राखण्याचं आवाहन केलं.

तसंच त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एन.आर.सी. आणि सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी न करण्याबाबतच्या जाहिराती मागे घेण्याची ही विनंती केली. मुर्शिदाबाद, बीरभूम, दक्षिण चौबींस परगना, आणि बर्धवानमधे हिंसाचाराच्या घटना घडल्याचं वृत्त आहे.

अनेक स्थानिक तसंच लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. अनेक भागात जाळपोळ आणि रास्ता रोकोच्या घटना घडल्याचं वृत्त आहे. दरम्यान राज्य प्रशासनानं सहा जिल्ह्यांमधे इंटरनेट सेवा खंडित केली आहे.