पाकिस्तानविरोधात १९७१च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचा स्मृतीदिन अर्थात विजय दिवस आज देशभरात उत्साहानं साजरा होत आहे. या युद्धात शहीद झालेल्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. १९७१ साली आजच्याच दिवशी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल ए.ए. खान नियाझी यांनी, आपल्या ९३ हजार सैन्यांसह भारतीय लष्कर आणि मुक्तीवाहिनीच्या संयुक्त सैन्यदलासमोर विनाअट शरणागती पत्करली होती. हे युद्ध संपल्यानंतरच त्यावेळचा पूर्व पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश म्हणून उदयाला आला.