नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियम झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, वेस्ट इंडिजनं शाई होप आणि शिमरॉन हेटमायर यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताचा 8 गडी राखून पराभव केला.

हेटमायरनं 106 चेंडूत 139 धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमधे वेस्ट इंडिनं या विजयामुळे 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतानं विजयासाठी ठेवलेलं 288 धावाचं उद्दिष्ट वेस्ट इंडिजनं केवळ 2 गडी गमावून साध्य केलं.

भारतानं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 288 धावा केल्या होत्या. यामधे रिषभ पंतनं 69 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं. या मालिकेतला दुसरा सामना येत्या बुधवारी विशाखापट्टणम इथं खेळला जाईल.