नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून रवी मित्तल यांनी कार्यभार स्वीकारला. श्री. मित्तल हे १९८६ च्या बिहारमधील तुकडीतले भारतीय प्रशासन सेवेतले अधिकारी आहेत.
त्यांनी अमित खरे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. खरे यांची उच्चशिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. श्री. मित्तल यांनी याआधी वित्त मंत्रालयाच्या अर्थसेवा विभागाचे विशेष सचिव म्हणून काम पाहिलं आहे.