नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर याला दिल्लीतल्या न्यायालयानं दोषी ठरवलं. या खटल्यातला दुसरा आरोपी शशी सिंग याला मात्र न्यायालयानं निर्दोष ठरवलं.

येत्या बुधवारी न्यायालय सेंगरला शिक्षा सुनावणार आहे. भारतीय दंड संहिता तसंच पोक्सो कायद्याच्या कलमांतर्गत त्याला दोषी ठरवलं आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.