पुणे : पुणे जिल्हयातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा शनिवार दि. 21 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी सभागृह, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे आयोजित केलेला आहे. सदर मेळाव्यामध्ये सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना निवृत्तीवेतनाबाबत येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या मेळाव्यास पुणे जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे कोषागार कार्यालयाकडून करण्यात आले आहे. असे वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्राकान्वये कळविले आहे.