नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं ओदिसात चांदीपूर इथून दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. पिनाक गाईडेड रॉकेट प्रणालीचं प्रक्षेपण DRDO अर्थात संशोधन आणि विकास संस्थेच्या परीक्षण केंद्रावरुन झालं.

पृष्ठभागावरून हवेत मारा करु शकणार्‍या आणि सर्वप्रकारच्या हवामानात तग धरु शकणार्‍या QR-SAM या क्षेपणास्त्राची चाचणीही एकीकृत परीक्षण केंद्रावरुन घेतल्याचं DRDO नं सांगितलं.