मुंबई (वृत्तसंस्था) : उपयोगिता प्रमाणपत्रं सादर न करणं म्हणजे घोटाळा नाही, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं विधानसभेत दिलं. कॅगच्या अहवालामध्ये गेल्या सरकारच्या काळात ६५ हजार ९२१ कोटी रुपयांच्या कामांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असल्याचा आरोप मंत्री जयंत पाटील यांनी केला होता, त्यावर फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

एखादं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उपयोगिता प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत सादर करायचं असतं. केवळ २०१८ पर्यंतच्या कालावधीत ६५ हजार ९२१ कोटी रुपयांच्या कामाची ३२ हजार ५७० उपयोगिता प्रमाणपत्रं सादर करण्यात आलेली नाहीत म्हणून त्यास घोटाळा म्हणणे चूक असल्याचं ते म्हणाले.