मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याची आर्थिक स्थिती खालवण्यासंदर्भात कॅगनं दिलेल्या अहवालाची राज्य सरकारनं सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस सरकारनं आर्थिक शिस्त बिघडवल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती खराब झाली, असा कॅगचा अहवाल असल्याचं पवार म्हणाले. भाजपा सरकारच्या काळात सामाजिक सौहार्द बिघडल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं पवार यांनी यावेळी सांगितलं.