मुंबई (वृत्तसंस्था) : देशात दंगलीसदृश्य परिस्थिती आहे, मात्र मोर्चे काढणाऱ्या अनेक लोकांना या कायद्यांबाबत माहिती नसल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या सर्वात मोठ्या आर्थिक मंदीवरील लोकांच लक्ष हटवण्यासाठी  नागरिकत्व कायद्याची खेळी केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

देशात जे १२५ कोटी नागरिक आहेत त्यांचीच सोय नाही तर मग बाहेरच्या नागरिकांना नागरिकत्व देण्याची गरज काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसंच या देशात पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेल्या नागरिकांना हकलून लावण्याची गरज असल्याचं राज ठाकरे  म्हणाले. महाराष्ट्रात सत्तास्थापनेमध्ये जे काही घडलं ते मतदारांशी प्रतारणा असल्याचं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सत्तास्थापनेसाठी केलेली युती देखील चुकीचीच होती अशी टिकाही राज यांनी केली.