मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या रॅलीचे आयोजक संविधान सन्मान मंचानं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. रॅलीत उपस्थित नागरिकांच्या हातात तिरंगा झेंडा आणि बॅनर होते.
आमचे नागरीकत्व सुधारणा कायद्याला समर्थन आहे, असं या बॅनरवर लिहीलं होतं. दोनच दिवसांपुर्वी ऑगस्ट क्रांती मैदानात नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मोठ्या संख्येनं सिनेनाट्य जगतातली मंडळी उपस्थित होती. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी या कायद्याच्या समर्थनार्थ दादर इथं रॅली काढण्यात आली.