नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाताळाचा सण सर्वत्र श्रद्धेनं आणि उत्साहानं साजरा होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस जगभरातले ख्रिस्ती बांधव जल्लोषात साजरा करत असतात.

यानिमित्तानं घरोघरी ‘ख्रिसमस ट्री’ उभारला जातो, चककत्या कागदी चांदण्या आणि भेट वस्तूंची देवाण-घेवाण यांनी वातावरण भारुन जातं तसंच बहुसंख्येनं धार्मिक प्रार्थना म्हटल्या जातात.