मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं दिलेलं पोलीस संरक्षण काढून घ्यावं, असं पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको, माझं काही बर वाईट झालं तर त्याला मीच जबाबदार राहीन, असं पत्रात म्हटलं आहे.

मंदिरात रहाणार्‍या माझ्यासारख्या एका फकीराच्या सुरक्षेवर सरकार फार मोठा खर्च करत आहे. कररुपानं आलेल्या पैशांचा हा अपव्यय पहावत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महिला सुरक्षा संबंधीच्या विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे 20 डिसेंबरपासून राळेगणसिद्धी इथं मौनव्रत करत आहेत. या काळातच त्यांनी हे पत्र पाठवलं.