नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय ‘फिट इंडीया’ अभियानाला चालना देण्यासाठी आरोग्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या संबंधित अभियानाचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
देशात सर्व वयोगटात तंदुरुस्तीबद्दल जागृती वाढवण्याबाबत क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांच्याबरोबर काल झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी वार्ताहरांना ही महिती दिली.
देशवासीयांनी शारिरीक आणि मानसिकदृष्टया तंदुरुस्त राहावं, यासाठी खेळांना दैनंदिन जीवनात स्थान द्यावं याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावर्षी ‘फीट इंडिया’ अभियानाची घोषणा केली होती.