नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात, शुक्रवारच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा व्यवस्था वाढवली असून, नागरिकत्व दुरस्ती कायद्याबाबत पोलीस जनजागृती मोहीम राबवत आहेत, तसंच शांतता समित्यांच्या बैठका होत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, अलिगड, आग्रा, मथुरा आणि बुलंदशहर यांच्यासह अनेक जिल्ह्यांमधे रात्रीपासून इंटरनेट सेवा बंद केली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ सुरु असलेल्या आंदोलनात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकं नेमली आहेत. आंदोलन काळात सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी ३७२ जणांना पोलिसांनी मालमत्ता जप्तीच्या नोटीसा जारी केल्या आहेत.