नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन, रशिया आणि इराण यांची त्रिपक्षीय नाविक कवायत आजपासून ओमानच्या आखातात सुरु होत आहे.    येत्या 30 तारखेपर्यंत ही कवायत चालणार आहे.

चीनचे संरक्षण प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी बीजिंग इथं बातमीदारंना ही माहिती दिली. तिन्ही देशांच्या नौदलांमधे देवाणघेवाण आणि सहकार्य वाढवणं हा या कवायतीचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.