नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापरचा एल.पी.जी. गॅस सिलेंडर ५ रुपये ९१ पैशांनी स्वस्त झाला आहे. ही दर कपात कालपासून लागू झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झाल्यामुळे एल.पी.जी. गॅस स्वस्त झाला आहे.
नव्या दरानुसार १४ किलो २०० ग्रॅम वजनाच्या अनुदानित गॅस सिलेंडरचा राजधानी दिल्लीतला भाव ४९४ रुपये ९९ पैसे इतका असेल. विनाअनुदानित गॅस सिलेंडर १२० रुपये ५० पैशांनी स्वस्त झाले आहेत अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं दिली आहे.
१४ किलो २०० ग्रॅम वजनाच्या विना अनुदानित गॅस सिलेंडरचा राजधानी दिल्लीतला भाव आता ६८९ रुपये इतका असेल.