नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं बँक घोटाळा संबंधित आरोपी पप्पू सिंग आणि त्याच्या कटुंबियांकडून ५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यामधे घरं, पोल्ट्री फार्म्स तसंच फिश टँक आदिंचा समावेश आहे.
सीबीआय आणि भ्रष्टाचारविरोधी दल, विशाखापट्टणम यांनी मनी लाँडरिंग संदर्भात सादर केलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.