नवी दिल्ली : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे ज्यांनी अद्याप लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 रोजी संपली. मात्र आधार-पॅन लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. आत्तापर्यंत मुदतवाढ देण्याची ही आठवी वेळ आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एक निर्णय दिला होता. ज्यानुसार आधार कार्ड आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड हवं असल्यास बंधनकारक आहे. 1 जुलै 2017 पासून पॅन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळण्याचा अधिकार आहे.
आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI कडून भारतातल्या नागरिकाला मिळते. तर पॅन हा दहा अंकांचा क्रमांक आयकर विभागाकडून दिला जातो. हा क्रमांक एखाद्या व्यक्तीचा किंवा कंपनीचा असू शकतो.
आधार आणि पॅन कार्ड कसे लिंक कराल?
https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या वेबसाईटवर जा
त्यानंतर डाव्या बाजूला Link Aadhaar हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.