नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 1965 साली झालेल्या युद्धानंतर बंद करण्यात आलेले भारताशी जोडलेले रेल्वेमार्ग पुन्हा सुरु करण्याची घोषणा बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांनी केली आहे. ढाका आणि कुरीग्राम यांच्यादरम्यान पहिल्या रेल्वेसेवेच्या उद्धाटन कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या रेल्वेमार्गामुळे दोन देशांमधली संपर्क व्यवस्था वाढू शकेल. तसंच बांगलादेशच्या रेल्वेला यामुळे नफा मिळेल, असं त्या म्हणाल्या.

2008 साली ढाका आणि कोलकत्यादरम्यान मैत्री एक्सप्रेस ही पहिली रेल्वेसेवा सुरु झाली तर 2017 मधे कोलकाता आणि खुलना दरम्यान बंधन एक्सप्रेस सुरु झाली. सध्या भारत-बांगलादेश दरम्यान चार रेल्वेसेवा सुरु आहेत.