नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पुन्हा एकदा चौकशी केली.
काही कोटी रुपयांच्या कथित विमान घोटाळ्यामुळे एअर इंडियाला झालेला तोटा आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना वितरित करायच्या वेळेमध्ये दिसून आलेली अनियमितता याप्रकरणांबाबत ही चौकशी झाली.
यावेळी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत चिदंबरम यांचा जबाब नोंदवला आहे.