नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १४ आसाम मधल्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात गेल्या वर्षी गेंड्यांची शिकार करण्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या वर्षी अशाप्रकारच्या केवळ ३ घटनांची नोंद झाली. ही गेल्या १० वर्षांमधली सर्वात कमी संख्या आहे.
बोलाघाट आणि बिस्वनाथ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका गेंड्याच्या शिकारीचा गुन्हा घडला, मात्र नागांव, सोनितपुर आणि कार्बी आंगलाँग या जिल्ह्यांमध्ये गेंड्यांच्या शिकारीची कोणतीच घटना घडली नाही, अशी माहिती काझीरंगा अभयारण्याचे संचालक पी. शिवकुमार यांनी दिली आहे.
यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राहावा याची खबरदारी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी घेतली होती. त्यामुळे शिकारीचं प्रमाण घटलं असंही शिवकुमार यांनी म्हटलं आहे.