नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका घेतल्या जातील, असं जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू यांनी सांगितलं. ते जम्मू विभागातल्या रेआसी जिल्ह्यात तलवारा इथं राज्य पोलीस दलाच्या दिक्षांत संचलनानंतर बोलत होते.
जम्मू आणि कश्मीरमधे शांतता कायम राखण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी पोलीसांचं कौतुक केलं. शांतता कायम राखताना पोलीसांनी महान त्याग केल्याचं सांगत, निवडणूकामधेही पोलीसांची मुख्य भूमिका असेल, असं मुरमू यावेळी म्हणाले.