नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाम रायफलच्या जवानांनी मणिपूरमधे भारत-म्यानमारच्या सीमेलगत मोरेह शहराजवळ ३ कोटी ८० लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.

गस्त घालत असताना भारत-म्यानमारच्या सीमेलगत एक अनोळखी इसम भारतीय हद्दीत घुसताना दिसला. जवानांनी या इसमाला हटकलं असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला जवानांनी अटक केली.