नवी दिल्ली : योग्य आहार अभियानात जनतेने सहभागी होऊन या अभियानाला जन चळवळीचे स्वरुप द्यावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातल्या जनतेला केले आहे. पहिल्या जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

‘अन्न सुरक्षा प्रत्येकाची जबाबदारी’ ही या दिनाची संकल्पना आहे. अन्नाचा एकही कण वाया जाऊ नये यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून अन्नसुरक्षेप्रति योगदान द्यावे यामुळे दारिद्रय, उपासमार आणि कुपोषणाला हद्दपार करण्यासाठी मदत होईल असे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे या कार्यक्रमाला उपस्थित होते.