नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या तज्ञांची बैठक येत्या गुरुवारी होणार आहे. अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी होणा-या या बैठकीत नीती आयोगाचे उपाध्याक्ष राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील.

२०२० – २१ सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची आणखी प्रक्रिया सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. प्रधानमंत्र्यांनी काल देशातल्या वरिष्ठ उद्योगपतींशी अर्थव्यवस्थेतल्या अडचणींचा आढावा घेतला. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसंच रोजगार निर्मितीसाठी असणा-या उपायांवषियीही यावेळी चर्चा झाली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या एक फेब्रुवारीला त्यांचा दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याच अर्थव्यवस्थेच्या वाढीवर भर असेल.