नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल पासून ५० हजार कोटी रुपयांचा अर्थव्यवहार निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
पर्यावरणपूरक इंधनामुळे पर्यावण आणि अर्थव्यवस्था दोघांना फायदा होतो, असं ते म्हणाले. गेली अनेक वर्षे इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यासंदर्भात विचार सुरु होता, पण आम्ही खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी करायचं ठरवलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
सर्वच तेल कंपन्या पर्यावरणपूरक इंधनाचा विचार करू लागल्या आहेत, हे एक सकारात्मक पाऊल आहे, त्यामुळे कच्च्या तेलावरच अवलंबित्व कमी होईल, असंही गडकरी म्हणाले.