नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख व्यक्तीची हत्या, नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि पावित्र्यभंगाच्या प्रकरणाचं भारतानं तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं काल पाकिस्तानचे प्रभारी उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडे याबाबत निषेध नोंदवला.
पाकिस्तान सरकारनं टाळाटाळ करणं सोडून, या प्रकरणातल्या गुन्हेगारांना त्यांच्या घृणास्पद कृत्यांसाठी कडक शासन करावं, आणि आपल्या देशातल्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कृती करावी, असं भारत सरकारनं पाकिस्तानला बजावलं आहे.